श्रीक्षेत्र थेऊर गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार अशोक पवार

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

थेऊर (ता.हवेली) येथे विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. थेऊर येथील उड्डाणपुल ते काकडे मळा चौक व शिवदत्तनगर (थेऊर-नायगाव शिवरस्ता) तसेच स्ट्रीट लाईट नसलेल्या इतर विविध ठिकाणी अशा १०० नवीन LED स्ट्रीट लाईट पोलचे उदघाटन, तसेच काकडे मळा येथील ३ व गाढवे कॉर्नर येथील १ अशा ४ हायमास्ट लाईट पोलचेही उदघाटन यावेळी करण्यात आले. शिवदत्तनगर (थेऊर-नायगाव शिवरस्ता) येथील उंच पाणी टाकी आणि काकडे मळा येथील पाणी टाकी व वितरण व्यवस्था याचाही शुभारंभ शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, काळूराम कांबळे, सरपंच संगिताताई तारू, उपसरपंच नितीन कुंजीर, तलाठी दिलीप पलांडे, माजी सरपंच छायाताई काकडे, सुरेखाताई कुंजीर, माजी उपसरपंच भाऊसाहेब काळे, विलास कुंजीर, सदस्य काशीनाथ कोळेकर, राहुल कांबळे, गजानन आगलावे, श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन संदीप धुमाळ, गोविंद तारू, दत्तात्रय कुंजीर, संजय कुंजीर, संजय गावडे, युवराज काकडे तसेच परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी आमदार अशोक पवार यांनी भविष्यात थेऊर गावासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.

Previous articleदौंड मध्ये कोरोना चे 5 रुग्ण पॉजिटिव्ह
Next articleश्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त नारायणगाव परिसरात जल्लोष; घराघरात लाडूंचे केले वाटप