एक वही, एक पेन अर्पण करून महामानवाला अभिवादन; ह्यूमन हेल्प फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

दिनेश पवार,दौंड

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र आपल्या देशवासियांना दिला.याच मूलमंत्राचा आधार घेऊन ह्यूमन हेल्प फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सलग चौथे वर्षे एक वही एक पेन उपक्रम ठेऊन अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

ह्यूमन हेल्प फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था तळागाळातील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत असते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जनतेला संस्थेच्या वतीने अहवाहन केले जाते की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येताना एक वही व एक पेन देऊन अभिवादन करावे ते जमा झालेली शालेय साहित्य गरजवंत विद्यार्थ्यांना दिले जाते.संस्थेच्या अहवाहनाला दौंडच्या जनतेने योग्य ते सहकार्य देखील केले.तसेच या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष पवन साळवे,उपाध्यक्ष-प्रज्ञेश कांबळे,सचिव-शेखर पाळेकर,खजिनदार-सुमित गायकवाड,व स्वप्नील शिंदे,प्रशांत कोरबल्लू, जमीर शेख. यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleनिवडणूका थांबवायच्या असतील तर सर्वच थांबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleएमटीडीसी नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबविणार