सिद्धांत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने लोहगडावर स्वच्छता अभियान

तळेगाव दाभाडे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुदुंबरे येथील सिद्धांत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने किल्ले लोहगड येथे स्वछता अभियान राबविण्यात आले. या अभियानात एकूण ५०विद्यार्थी स्वयंसेवक आणि १० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

गड पायथ्याशी असलेल्या शिवस्मारक येथे लोहगडवाडीचे सरपंच नागेश मरगळे व रा.से.यो.च्या महाविद्यालय समन्वयक प्राचार्या नंदा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते स्वछता अभियानाला सुरुवात झाली.यानंतर गडाच्या पायऱ्या,महाद्वार,सदर, लक्ष्मीकोठी,श्री त्र्यंबक महादेव मंदिर इ.ठिकाणी स्वछता करण्यात आली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.सोनाली रणदाळे यांनी केले. त्यानंतर या अभियानाचे प्रमुख आणि इतिहास अभ्यासक पद्मभूषण डंबे यांनी किल्ल्याचा इतिहास आणि दुर्गसंवर्धन याविषयी आपले विचार मांडले. प्रा.मयूर कदम व प्रा.निलेश कड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.दत्तात्रय गाडे यांनी कै.श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सामूहिक शिववंदनेने अभियानाचा समारोप करण्यात आला.या अभियानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आणि प्राचार्य उत्तम शिंदे, राहुल खंडागळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या स्वछता अभियानासाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ प्रेरित लोहगड विसापूर विकास मंच आणि भारतीय पुरातत्व विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleव्यापाऱ्याच्या हातातून 19 लाख 64 हजार रूपयांची पिशवी पळवून नेणाऱ्या आरोपींना १२ तासांमध्ये दौंड पोलिसांनी केले गजाआड
Next articleनिवडणूका थांबवायच्या असतील तर सर्वच थांबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार