व्यापाऱ्याच्या हातातून 19 लाख 64 हजार रूपयांची पिशवी पळवून नेणाऱ्या आरोपींना १२ तासांमध्ये दौंड पोलिसांनी केले गजाआड

दिनेश पवार

दौंड – शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी भक्तु नेवदमल सुखेजा यांच्या हातातील 19 लाख 64 हजार रुपयांची पिशवी हिसका मारून पळवून नेणाऱ्या आरोपींना दौंड पोलिसांनी 12 तासाच्या आत पकडून गजाआड करून धडाकेबाज कामगिरी केली आहे.

घटना घडताच दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी, डी.बी.पथक यांची तीन पथके तयार करून तत्काळ तपास सुरू करून संशयित आरोपी कमल उर्फ कोमल हिरमटकर( वय 28,रा.गांधीनगर देहूरोड सध्या रा. गोवागल्ली दौंड),आकाश आरमुघम पिल्ले (वय 31,रा.देहूरोड पुणे),प्रदीप ऊर्फ गणेश महेश कोळी(रा.तेलगू कॉलनी संभाजी नगर दौंड )यांना ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक राहुल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी,महेश आबनावे, भगवान पालवे,सुशील लोंढे,सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे,पोपट जाधव,महेंद्र गायकवाड, हवालदार सुभाष राऊत,पांडुरंग थोरात, पोलीस नाईक अमोल गवळी,रणजित निकम, विशाल जावळे, आमिर शेख,सचिन बोराडे,आण्णासाहेब देशमुख, नारायण वलेकर,कॉन्स्टेबल अमोल देवकाते, सागर गायकवाड, गिरमे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत केली

Previous articleगोसासीमध्ये जलसमृद्धी प्रकल्पाचे उद्घाटन
Next articleसिद्धांत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने लोहगडावर स्वच्छता अभियान