गोसासीमध्ये जलसमृद्धी प्रकल्पाचे उद्घाटन

राजगुरूनगर -गोसासी (ता.खेड) येथे शाफलर इंडिया लिमिटेड पुरस्कृत व बायफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली जलसमृद्धी प्रकल्पाचे उद्घाटन बायफ संस्थेचे पदाधिकारी सौ स्नेहा शिंदे (वरिष्ठ अधिकारी) व श्री पंकजजी कट्टे (प्रकल्प अधिकारी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


या प्रकल्पाअंतर्गत पाहिल्या वर्षी रु. ३० लक्ष, दुसऱ्या वर्षी रु.६० लक्ष तर तिसऱ्या वर्षी रु.६० लक्ष खर्च केले जाणार आहेत. यापैकी पाणलोट क्षेत्र विकासावर ८०% तर शेतकरी व महिला विकासासाठी २०% निधीचा उपयोग केला जाणार आहे.

गावातील डोंगर माथ्यावर व पायथ्याला झुरीला LBS बंधारे बांधकाम व सलग समतल चर करणे, ओढ्यांचे खोलीकरण करणे, ओढ्यांवर सिमेंटचे गबिअन बंधारे करणे, शेतकरी सक्षम व शिक्षित करणे, इत्यादी अनेक पाणलोट ची कामे पुर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सरपंच संतोष गोरडे यांनी सांगितले.तसेच शेती प्रशिक्षण व सपोर्ट, व्यवसाय प्रशिक्षण, व सपोर्ट , शेळी पालन शेड, कुकुट पालन शेड, बचत गटांसाठी लघुउद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले

यावेळी गोसासी ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य, बापदेव पाणलोट क्षेत्र विकास समिती सदस्य व मोठ्या ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवणुकीसाठी शिवसेना सज्ज
Next articleव्यापाऱ्याच्या हातातून 19 लाख 64 हजार रूपयांची पिशवी पळवून नेणाऱ्या आरोपींना १२ तासांमध्ये दौंड पोलिसांनी केले गजाआड