दौंड मध्ये कोरोना चे 5 रुग्ण पॉजिटिव्ह

दिनेश पवार-दौंड(,प्रतिनिधी)

दौंड शहरात व ग्रामीण मध्ये कोरोना चे एकूण 5 रुग्ण आज पॉजिटिव्ह आल्याची माहिती, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक -डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 4/8/20 रोजी एकुण 72जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दि.5 रोजी प्राप्त झाले.

त्यापैकी एकूण 5 व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 61व्यक्ती चे report negative आले आहेत.6 जणांचे report अजून प्रलंबित आहेत.
Positive रुग्णामध्ये महिला-4 तर पुरुष-1 असा समावेश आहे, यातील 4 रुग्ण दौंड शहरातील,गांधी चौक-3,चंद्रभागा नगर-1,असा समावेश आहे तर एक रुग्ण ग्रामीण मधील गोपाळवाडी येथील आहे, हे सर्व रुग्ण 14 ते 58 या वयोगटातील आहेत.कोरोना टेस्ट निगेटिव्ह येण्याचे प्रमाण वाढल्याने दौंडकराना दिलासा मिळत आहे, तसेच दौंड मध्ये नगरपालिका चा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन, यांच्या सततच्या कामगिरी मुळे कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे,नागरिकांनी देखील सहकार्य केल्यास सध्याचे प्रमाण ही आटोक्यात नक्कीच येईल.

कोरोना परिस्थिती घालवण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती होणे खूप गरजेचे आहे,अत्यावश्यक सुविधा साठी बाहेर पडणे,मास्क,सॅनिटायजर, चा वापर करणे,सुरक्षित अंतर ठेवणे,अफवांवर विश्वास न ठेवणे,डॉक्टर,नर्स,आरोग्य अधिकारी व कर्मचारी ,पोलीस यांचा आदर करून त्यांना सहकार्य करणे ह्या गोष्टी आपण आचरणात आणल्या तर नक्कीच कोरोना वरती आपण मात करू.
“” कोरोना वरती एकच मंत्र,
घरी रहा,सुरक्षित रहा हेच तंत्र””

Previous articleशिवसेना खडकवासला महिला आघाडीच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी
Next articleश्रीक्षेत्र थेऊर गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार अशोक पवार