केडगावमध्ये रेकॉर्डब्रेक ५१० जणांचे रक्तदान

अमोल भोसले,उरुळी कांचन

केडगाव स्टेशन,लालचंदनगर येथे भव्यदिव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिराचे हे दुसरे वर्ष आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आम्ही केडगावकर -बोरीपार्धी, कोविड हेल्प सेंटर ग्रुप दौंड तालुका, अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका, महात्मा फुले उत्सव समिती केडगाव, जैन श्रावक संघ, साई ग्रुप दौंड तालुका, दौंड तालुका पत्रकार संघ, भारतीय जैन संघटना दौंड तालुका, दौंड शहर व तालुका फोटोग्राफर असोसिएशन, श्री स्वामी समर्थ मठ केडगाव २२ फाटा, एक मित्र एक वृक्ष ग्रुप केडगाव, केडगाव पोलीस स्टेशन व पोलीस मित्र परिवार, SSY ग्रुप केडगाव तसेच सर्व ग्रामस्थ केडगाव-बोरीपार्धी यांनी शिबिराचे एकत्रितपणे आयोजन केले होते.

सध्या राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे आणि सालाबादप्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम संपन्न झाला.सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चालू होते. गतवर्षी याच ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरात 404 जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला होता तर यावर्षी 510 जणांनी रक्तदान करून गतवर्षीचा रेकॉर्ड मोडीत काढीत आज रक्तदानाबाबत उच्चांक केला. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने थंडीपासून संरक्षण करणारे जर्किंन आणि सर्टिफिकेट भेट देण्यात आले. तसेच रक्तदान करणाऱ्यांसाठी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने चहा-बिस्कीट,केळी,सफरचंद याचीही सोय केली होती. रक्तदानाच्या सुरुवातीलाच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नारायणजी पवार साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.

त्यानंतर दिवसभरामध्ये दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा मा.आमदार रमेश थोरात, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन आनंदा थोरात, महिला व बालकल्याण समिती पुणे जिल्हा परिषद सभापती राणीताई शेळके, मा.सभापती दिलीप हंडाळ, मा.उपसभापती झुंबर गायकवाड, डॉक्टर वंदनाताई मोहिते, भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सचिव मयूर सोळसकर, मराठा महासंघ दौंड तालुका उद्योग व्यापार आघाडीचे अध्यक्ष सूरज चोरगे, केडगावचे उपसरपंच सतीश बारवकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश पांढरे, बोरीपार्धी सरपंच सुनील सोडनवर, बोरीपार्धी ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडवनर, दैनिक सकाळचे पत्रकार रमेश वत्रे , दैनिक लोकमतचे पत्रकार प्रकाश शेलार , दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार बापूसाहेब नवले सर, आदी मान्यवरांनी दिवसभरामध्ये रक्तदान शिबिराला भेटी दिल्या. सदर कार्यक्रमाला जागा दरवर्षीप्रमाणे केडगावचे उद्योजक नितीनशेठ छाजेड मित्र परिवार यांनी उपलब्ध करून दिली.

दिवसभर संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक/आयोजक म्हणून केडगाव ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य नितीन जगताप, धनराज मासाळ, डॉक्टर संदीप देशमुख, सलमान खान, प्रीतम गांधी, समीर पठाण, निलेश कुंभार, सचिन गायकवाड, कृष्णा फरगडे, योगेश मोकाशी, अमोल जाधव, किशोर सातपुते, अविनाश चव्हाण, दादा शेंडगे, संदीप कोठारी, अनिस कांबळे, आविनाश खुंटे, स्वातीमाँ, ज्योतीमाँ यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे आयोजन कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करुन करण्यात आले होते.

Previous articleतैलबैला सुळक्यावर टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Next articleआळेफाटा येथे इलेक्ट्रॉनिक दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटले