तैलबैला सुळक्यावर टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

राजगुरूनगर-सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा तैलबैला सुळकावर (फ्रंट वॉल) टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सर करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करीत तिरंगा फडकावून ही साहसी मोहीम समर्पित केली.

या मोहीमेची सुरवात मुळशी तालुक्यातील तैलबैला येथून झाली. अवघ्या पाऊण तासांची पायपीट तैलबैलाच्या पायथ्याला घेऊन जाते. आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून आरोहण करावे लागते.

पहिला १०० फुटी टप्पा पार केल्यावर एक छोटा ट्रॅवर्स मारल्यावर २० फुट आरोहण केल्यावर दुसरा टप्पा येतो. या नंतर अंगावर येणारा पुढील १०० फुटी टप्पा चिकाटीने पार करताना कस लागतो. शेवटचा ३० फुटी टप्पा पार केल्यावर शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील ३०० फुटी सरळसोट कठीण चढाई, २०० फुटी रॅपलिंगचा थरार, पाहताक्षणीच मनात धडकी भरावी असे तैलबैलाचे रांगडे रूप, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंखे, ज्ञानो ठाकरे, मंदार आव्हाड, रोहित पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित जाधव, ज्योती राक्षे-आवरी, माधुरी पवार, प्रदीप बारी, अथर्व शेटे, धनाजी पन्हाळे, आरोही सचिन लोखंडे (वय, ६ वर्षे) ज्ञानदा सचिन कदम(वय ,६ वर्षे), स्वराज ढेंबरे, सचिन कदम, अपर्णा मिरशे, मोक्षदा कदम, शिवाजी जाधव, डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleकुरकुंभ गावच्या सरपंचपदी आयुब शेख यांची निवड
Next articleकेडगावमध्ये रेकॉर्डब्रेक ५१० जणांचे रक्तदान