मावळच्या सुपुत्रांचे नेमबाजी स्पर्धेत यश

पवनानगर- भोपाळ येथे झालेल्या ६४ नॅशनल शूटिंग चाँपियनशिप स्पर्धेत ओझर्डे गावातील दया बाळासाहेब पारखी व तसेच लोणावळा येथील साहिल दिपक मावकर या दोघांना रेनौनेद(renowed) नेमबाज ही पदवी मिळवण्यास यशशवी झाले आहे.त्या दोघांची निवड कुमार सुरेंद्र सिंह शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये झाली आहे.

भोपाळ येथे झालेल्या ६४ नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये दया बाळासाहेब पारखी याने छोट्या व मोठ्या गटामध्ये ६५४ पैकी ५७९.४ गुण मिळवले तर साहिल दीपक मावकर याने छोट्या व मोठ्या गटामध्ये ६५४ पैकी ५८९.२ गुण मिळवले आहे.दया व साहिल हे दोघेही नेमबाजीचे प्रशिक्षण कोच स्नेहल पाटील (कोल्हापूर) औझर्डे चे सरपंच बाळासाहेब पारखी व देवा दाभाडे (लोणावळा ) यांच्या कडून घेत आहे.

Previous articleअन्यथा राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करू – खा. डॉ अमोल कोल्हे
Next articleकोरेगावमुळ येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन