शिवसेना खडकवासला महिला आघाडीच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

एकीकडे कोरोनाचा कहर व दुसरीकडे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधन संपूर्ण देशात हा सण आनंदाने साजरा करण्यात येतो. परंतु सीमेवर जवान व चोवीस तास रक्षण करणारे पोलीस बांधव काम करत असतात व त्यांना कोणताही सण साजरा करता येत नाही. किंवा केला तरी ते आपल्या कुटुंबासोबत असतीलच असे काही नाही. देशात हा सण साजरा होत असताना कोरोनामुळे नागरिकांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असणारे पोलीस बांधवांना मात्र कामावर हजर रहावे लागते. यासाठी रक्षाबंधनचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडी खडकवासला यांच्या वतीने हवेली पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला.

यावेळी सिंहगड पोलीस स्टेशनचे राठोड साहेब, शेळके साहेब, हवेली पोलीस स्टेशनचे पी आय शेळके साहेब उपस्थित होते. यावेळी पोलीस बांधवांना राखी बांधून, मास्क व सॅनिटाइजर देऊन रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुवर्णा करंजावणे, अनिता मुनोत, उपतालुका प्रमुख कावेरी येनपुरे, मनिषा वांजळे,वर्षा कांबळे, युवा नेते गौरव करंजावणे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुका संघटीका पुजा रावेतकर यांनी केले होते

Previous articleउरुळी कांचन मध्ये आयुष मंत्रालयाच्या निर्देशा नुसार आयुरमंथन आयुर्वेदिक काढा मोफत वाटप सप्ताहाचे आयोजन
Next articleदौंड मध्ये कोरोना चे 5 रुग्ण पॉजिटिव्ह