उरुळी कांचन मध्ये आयुष मंत्रालयाच्या निर्देशा नुसार आयुरमंथन आयुर्वेदिक काढा मोफत वाटप सप्ताहाचे आयोजन

अमोल भोसले,उरुळी कांचन — प्रतिनिधी

उरुळी कांचन (ता.हवेली) मधील कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले योगदान देताना आयुरमंथन आयुर्वेदिक काढ्याचा वापर आणि प्रचार हे आपले वैयक्तिक कर्तव्य म्हणून केले तर या महामारीतून आपण आपल्या गावाला दूर ठेवण्यात नक्कीच यशस्वी होऊ असे प्रतिपादन सरपंच राजश्री वनारसे यांनी या सप्ताहाचे उदघाटन करताना केले.

यावेळी उपसरपंच भाऊसाहेब कांचन, डॉ.सुचेता कदम, डॉ. प्रशांत शितोळे, भगवान जाधव, सुनील जगताप, जयदीप जाधव, अमोल भोसले, श्रीराम करमरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थिित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उरुळी कांचन ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, हवेली तालुका पत्रकार संघ व उरुळी कांचन मधील विविध सार्वजनिक मंडळाच्या व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आयुष मंत्रालयाच्या निर्देशा नुसार व डॉ प्रशांत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुरमंथन आयुर्वेदिक काढा मोफत वाटप” सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
उरुळी कांचन मधील नागरिकांसाठी मोफत काढा वाटप करण्याचा सहा दिवसांचा कार्यक्रम बुधवार दिनांक २९ जुलै ते सोमवार दिनांक ३ ऑगस्ट २०२० या कालावधीत संपन्न झाला.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या काढ्याचा उपयोग होत असल्यामुळे नागरिकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला, गावातील सर्व प्रभागात दररोज सकाळी १० ते १२ या वेळात सुमारे साडे तीन हजार नागरिकांनी सामाजिक अंतर पाळत याचा लाभ घेतला. या सप्ताहाच्या नियोजनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नगराचे संघचालक दत्तात्रय खेडेकर, किशोर कांचन, निखिल सोनवणे , सोहम जगताप, प्रज्वल दातार, पुष्कर आंबेकर, प्रज्वल पुणेकर, गौरव सोनवणे, सिद्धेश धोत्रे, नित्यानंद जगताप व ग्रामपंचायतचे सोमनाथ बगाडे व त्यांचे सहकारी यांनी महत्वाची भूमिका बजाविली.या उपक्रमात शंभो प्रतिष्ठान, श्रीकृष्ण मित्र मंडळ, शिवरत्न ज्वेलर्स, जानाई डेव्हलपर्स, साईनाथ मित्र मंडळ, श्रीमंत वीर तरुण मंडळ, शिवतेज तरुण मित्र मंडळ, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांनी विशेष सहकार्य केले.

Previous articleश्री.राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारचे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे मेसेज टाकू नये , दौंड पोलिसांचे आवाहन
Next articleशिवसेना खडकवासला महिला आघाडीच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी