श्री.राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारचे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे मेसेज टाकू नये , दौंड पोलिसांचे आवाहन

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

सर्व दौंड पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना कळविण्यात येत आहे की उद्या दि.५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचे दूरचित्रवाहिन्या वरून लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे .यामुळे कोणीही सार्वजनिक स्वरूपात मंदिरांमध्ये किंवा रस्त्यावर भूमिपूजन दिनानिमित्त एकत्र येणार नाहीत. फटाके व वाद्य वाजवणारे नाहीत. राम मंदिर उभारणीचा आनंद प्रत्येकाने मनामध्ये आणि घरांमध्ये साजरा करावा.
घटनेमध्ये प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल अभिमान असावा परंतु त्यामुळे दुसऱ्या धर्मात बद्दल सुद्धा आदर बाळगावा असे नमूद केलेले आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना भडकणार नाहीत असे कोणतेही कृत्य करू नये. सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक तरतुदींच्या आधारे न्यायनिवाडा करून राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे त्याचा सर्वांनी आदर करावा.
सध्या कोरोना संसर्गाची साथ सुरू आहे हा रोग एकत्र येण्यामुळे जास्त वाढत आहे त्यामुळे उत्सव सण कार्यक्रम या साठी एकत्र येणे टाळावे. शिक्षण, रेल्वे ,सार्वजनिक बस ,ज्यांना जीवनाच्या रक्तवाहिन्या समजल्या जाऊ शकतात त्यांच्यासाठी सुद्धा एकत्र येणे अजून प्रतिबंधित आहे. कारण कोरोनाचे चे संकट अद्याप संपलेले नाही. राम मंदिर भूमिपूजन साठी दौंड शहरामध्ये व इतरत्र चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कुणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी घरामध्ये ते राहूनच भूमिपूजन कार्यक्रम पहावा व आनंद घ्यावा.
यावेळी लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होईल असे मेसेज सोशल मीडियावर टाकू नये, sms/व्हॅट्सअप/फेसबुक/ट्विटर/टेलिग्राम/इन्स्टाग्राम/किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अफवा,संभ्रम निर्माण करणारे मेसेज टाकू नये, ग्रुप ऍडमिन ने आपल्या ग्रुपमधील सदस्यांना सूचना द्याव्यात, तसेच सेटिंगमध्ये जावून फक्त ग्रुप ऍडमिन मेसेज सेंड करेल,असे सेटिंग करावे,असे आवाहन दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.सुनिल महाडिक व पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा (IPS)यांनी केले आहे

Previous articleपुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मंजुरीचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleउरुळी कांचन मध्ये आयुष मंत्रालयाच्या निर्देशा नुसार आयुरमंथन आयुर्वेदिक काढा मोफत वाटप सप्ताहाचे आयोजन