कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची कामगारांची मागणी

चाकण – येथिल वाकी या ठिकाणी २००७ पासून चालू असलेली खाजगी कंपनी दि.४ /१ /२०२१ रोजी अचानक बंद करून कामगारांना कोणतीही पुर्व सूचना कोणतीही नोटीस न देता सरळ रस्त्यावर आणले आहे. कामगारांनी गेल्या ११ महिन्यापासून कंपनी मालक तसेच कंपनी व्यवस्थापनाला वारंवार विनंती केली कंपनीच्या मुख्य शाखेला जाऊन तामिळनाडू येथे भेट घेतली परंतू मालकाने व व्यवस्थापनातील कोणत्याच अधिकाऱ्यांनी कामगारांना न्याय देण्याचे काम केले नाही म्हणून ( दि.२७ ) रोजी हरेशभाई देखणे रिपाई महाराष्ट्र सचिव यांच्या नेतृत्वामध्ये चाकण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वैभव शिंगारे यांना सर्व कामगारांनी निवेदन दिले. तसेच  मालक व व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा हरेशभाई देखणे यांच्या नेतृत्वामध्ये चाकण पोलिस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे.यावेळी कामगारांचे प्रतिनिधी दत्ता वाळुंज , विकास वाटेकर, योगेश ठाकूर,रमेश भोसले, हरिदास शिंदे,सागर कड यांनी सांगितले.

Previous articleकिल्ले सिंहगडवर महाराष्ट्र गड किल्ले परिवार व फोर्ट ऍडव्हेंचर पुणे तर्फे स्वच्छता मोहीम संपन्न
Next articleडिंभा कालव्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान