किल्ले सिंहगडवर महाराष्ट्र गड किल्ले परिवार व फोर्ट ऍडव्हेंचर पुणे तर्फे स्वच्छता मोहीम संपन्न

राजगुरूनगर- सह्याद्रीतील कडे कपारीत 350 गड कोट असणारे आपले समृध्द महाराष्ट्र पण आज याच किल्ल्यावर प्लास्टिक अन् कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसते.म्हणूनच ध्यास गड किल्ल्यांना प्लास्टिक मुक्त करण्याचा हे ब्रीद मनाशी पक्के बांधून महाराष्ट्र गड किल्ले परिवार यांनी किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगडावर स्वच्छता मोहीम आयोजित केली होती.


सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरून आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला नमन करून या मोहिमेला सुरुवात झाली. सकाळी सात ते एकरा अशा जवळपास 4 तासात ही मोहीम फत्ते झाली. गडावरील सर्व पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक कागद, दारूच्या बाटल्या मोठ्या पिशवीत गोळा करण्यात आल्या. 55 मावळ्यांनी या मोहिमेत मोठ्या हिरीरीने सहभागी होऊन मोठ्या अभिमानाने सिंहगडाला प्लास्टिक मुक्त केले.

महाराष्ट्र गड किल्ले परिवार तर्फे वैभव ढेकणे, वैभव पाटील, सुयोग्य जाधव, धनाजी देवणे हे स्वयंसेवक सर्वांना गाईड करत होते.

या मोहिमेत पुणे, सातारा, कोल्हापूर अशा जवळपास 3-4 जिल्ह्यातून मावळे सहभागी झाले होते. यामध्ये प्रियांका जढर,सुभाष कुलकर्णी, जान्हवी उंडे, अभिषेक सुरग, निशा कुटे, रोहिणी नागरगोजे, मृदुला डेरे, शिवप्रसाद बिरादार, समाधान माळी, शिवाजी राऊत, रवी तगलुरे, शुभम हेगिष्टे, मयूर कोपडे, ऋषिकेश धरम,तेजस काकडे, दीपक साळुंके, विशाल चव्हाण, रवी कुंभार, आकाश नलावडे, अक्षय भोगाडे, अमोल ठाकर, उमेश गवारे, सोनू कांगडे, अनुजा वाबळे, आदर्श दोंतुल, ऋषिकेश सावंत,चेतन कांबळे, शैलेश पवार, गिरीष कापरे, आकाश गोरे, अमृता गोरे, विक्की चिंतळे, राहुल गायकवाड,नामदेव पोवार, दत्तात्रेय कापरे,सोपान दांडगुले, मोनाली साळुंके, अश्विनी डोख आदी सहभागी झाले होते.

तसेच या मोहिमेत महाराष्ट्र गड किल्ले परिवार सोबत फोर्ट ऍडव्हेंचर पुणे टीम चे मावळे ही सहभागी झाले होते. फोर्ट ऍडव्हेंचर चे ऍडमिन अक्षय भोगाडे यांनी भविष्यात ट्रेक सोबत दुर्ग संवर्धन मोहीम ही करणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र गड किल्ले तर्फे वैभव पाटील आणि सुयोग्य जाधव यांनी गड किल्ले संवर्धनाचे महत्व सांगितले तर धनाजी आणि वैभव ढेकणे यांनी सर्वांना पुन्हा एकत्र येत नव्या मोहिमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

ध्यास गड किल्ले संवर्धनाचा हे ब्रीद मनाशी बाळगून महाराष्ट्र गड किल्ले परिवार विविध किल्ल्यांवर अशा मोहीम आयोजित करत असतात.शब्दांकन : अक्षय भोगाडे (राजगुरुनगर, पुणे)

Previous articleमंचर घोडेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू
Next articleकंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची कामगारांची मागणी