मंचर घोडेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

मंचर घोडेगाव रोडवर भीमाशंकर हॉस्पिटल समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२८) रोजी घडली आहे.

एकनाथ बबनराव नाईक (वय ४७ व संगीता एकनाथ नाईक (वय ४२) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ बबनराव नाईक  व पत्नी संगीता  दुचाकीवरून मंचर घोडेगाव रस्त्यावरुन जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेत द्वारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी एकनाथ नाईक हे उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. तर संगीता नाईक यांच्यावर उपचार सुरु असताना मयत झाले असल्याचे सांगितले. याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात वाहन चालकावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleपाटस गावामध्ये मा. आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
Next articleकिल्ले सिंहगडवर महाराष्ट्र गड किल्ले परिवार व फोर्ट ऍडव्हेंचर पुणे तर्फे स्वच्छता मोहीम संपन्न