पाटस गावामध्ये मा. आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

योगेश राऊत, पाटस

माजी आमदार व पीडीसीसी बँकेचे चेअरमन मा.रमेश थोरात यांच्या हस्ते पाटस गावांमध्ये ठोंबरे वस्ती बंदिस्त गटर, कारखाना भिंत शेजारील रस्ता, पोपट चोरमले तामखडा रस्ता, बुद्धविहार उर्वरित बांधकाम , नवीन बाजार तळ रस्ता, डोंगरेश्वर रस्ता, मेडिकल ते बाजार तळ रस्ता, नवीन गाळे बांधकाम, शेख ते सय्यद घर बंदिस्त गटर, दफनभूमी साकव पूल, ग्रामपंचायत समोरील रस्ता, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद फंडातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब पवार , जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ सारिका ताई पानसरे ,पंचायत समिती सदस्य आशाताई शितोळे भीमा सहकारी साखर कारखाना मा.व्हाईस चेअरमन सत्वशील शितोळे ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे ,भीमा सहकारी साखर कारखाना संचालक माणिक भागवत ,दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सभापती सुभाष रंधवे, उत्पन्न बाजार समिती विद्यमान सभापती सागर शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य मा. सभापती मंदाकिनी ताई चव्हाण पाटस गावचे विद्यमान सरपंच अवंतिका ताई शितोळे उपसरपंच छगन म्हस्के ,ग्रामपंचायत मा. उपसरपंच शिवाजी ढमाले , अण्णासाहेब तांबे व ग्रामपंचायत सदस्य पाटस यावेळी उपस्थित होते.

Previous articleप्रशासनाने रिंगरोडसाठी शेतक-यांवर केलेल्या धक्काबुक्की निषेध: पंचायत समिती सदस्य शाम गावडे यांचा राजीनामा
Next articleमंचर घोडेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू