प्रशासनाने रिंगरोडसाठी शेतक-यांवर केलेल्या धक्काबुक्की निषेध: पंचायत समिती सदस्य शाम गावडे यांचा राजीनामा

अमोल भोसले,उरुळी कांचन

लोणीकंद पोलीस निरिक्षक गजानन पवार , निखिल पवार व अप्पर तहसीलदार चौबे यांनी रिंगरोडसाठी शेतक-यांवर केलेल्या धक्काबुक्की जाचाविरुद्ध चा आरोप करीत निषेध म्हणून वाडेबोल्हाई पंचायत समिती सदस्य शाम गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत पंचायत समिती पंचायत शाम गावडे यांनी सांगितले की सन २०१६ पासून रिंग रोड होण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय आज पर्यंत करण्यात येत असून शेतकरी व लोकप्रतिनिधी म्हणून खूप त्रास सहन करावा लागला आहे. बिवरी तालुका हवेली येथील मोजणी निमित्तही हा प्रकार घडला असून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात राजीनामा दिला असून हा राजीनामा हवेलीचे अप्पर तहसीलदार
विजयकुमार चौबे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

अप्पर तहसीलदार विजय कुमार चौबे यांच्या उपस्थितीत मोजणीचे काम चालू होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. कोणालाही कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की करण्यात आली नाही.

गजानन पवार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे

Previous articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात संविधान दिन साजरा
Next articleपाटस गावामध्ये मा. आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन