पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात संविधान दिन साजरा

अमोल भोसले,उरुळी कांचन

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन या ठिकाणी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.के.अडसूळ होते. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर.के.अडसूळ यांनी युवकांमध्ये संविधाना विषयी जागृती व्हावी, राज्य घटनेने दिलेले मुलभूत हक्क व अधिकार याविषयी युवकांनी जागरूक रहावे, आपल्याला मिळालेले हक्क व कर्तव्ये यांचा समाजाच्या हितासाठी उपयोग करावा व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवावी, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.धोंडगे एस. एस. यांनी आपल्या मनोगतात संविधान दिनाचे महत्त्व, राज्यघटनेतील मूलभूत हक्क व कर्तव्य या विषयी मार्गदर्शन केले. प्रा. उगाडे बी.व्ही. यांनी आपल्या मनोगतात राज्यघटनेतील कलमे व अधिकार यांची उदाहरणासह मांडणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. कुंजीर श्वेता व लावण्या मोरे या विद्यार्थिनींनी संविधान दिनानिमित्त संविधान दिनाचे महत्त्व, संविधान निर्मितीची कारणे या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.आबनावे एस. व्ही. तर आभार प्रा.गायकवाड एस. जे. यांनी मानले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मूल्य प्रतीक्षा या विद्यार्थिनीने केले याप्रसंगी प्रा.भाकरे आर. एस. व प्रा.बारवकर आर. एस. यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रसिद्धी विभागप्रमुख प्रा. विजय कानकाटे यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

Previous articleमहात्मा फुले आधुनिक भारताचे शिल्पकार- डॉ. श्रीमंत कोकाटे
Next articleप्रशासनाने रिंगरोडसाठी शेतक-यांवर केलेल्या धक्काबुक्की निषेध: पंचायत समिती सदस्य शाम गावडे यांचा राजीनामा