अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू

सुरेश बागल ,कुरकुंभ

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावच्या
आणि आणि एम .आई .डी .सी. चौकाच्या हद्दीमध्ये पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पाच जणांना चिरडल्याची घटना
घडल्याची माहिती समोर येत आहे. पायी रस्ता
क्रॉस करत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अज्ञात वाहन पुणे- सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूर दिशेने जात असताना पायी चालणाऱ्या माणसांकडून रस्ता क्रॉस करत असताना अज्ञात वाहनांची धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सर्वप्रथम जखमींना पाटस टोल रुग्णवाहिका कडून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर
मृतांना उपजिल्हा शासकीय रुग्णालय दौंड येथे
शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे.तसेच अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून तपास चालू आहे.

Previous articleदौंड मध्ये भरदिवसा घरातून 5 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
Next articleडॉ. सुमेध सोनवणे यांचा़ सन्मान