ऊस पाचट व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे , उपविभागीय कृषि, पुणे व तालुका कृषि अधिकारी, हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या वतीने मौजे फुरसुंगी येथे ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताह अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग व ऊस पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

सदर प्रशिक्षण वर्गात मेघराज वाळुंजकर, कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ यांनी ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताह चा उद्देश समजून सांगितला. मंडळ कृषि अधिकारी गुलाब कडलग यांनी खोडवा ऊस पिकातील ऊस पाचट व्यवस्थापन,ऊसाचा खोडवा निघाल्यानंतर चे पाचट व्यवस्थापन , हिरवळीचे खतांचा वापर,आंतरपिकांचा अवलंब करुन जमीनीतील सेंद्रिय कर्बाची वाढ करणेबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सहाय्यक ज्योती हिरवे यांनी केले तसेच मुक्ता गर्जे कृषि सहाय्यक, लोणी काळभोर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले

ऊस पाचट व्यवस्थापन प्रशिक्षण व प्रात्यक्षिकचे आयोजन प्रयोगशिल शेतकरी बापु आबुराव भेलुसे यांच्या शेतावर घेण्यात आले. त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सायकर, प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब पवार, सतीष हरपळे, उत्तम दुंडे , सतीष पवार, राणुजी झेंडे , माऊली हरपळे, दादा हरपळे, शामराव पवार ,वडकी ग्रामपंचायत चे सदस्य मछिंद्र गायकवाड, रवि मोडक व परिसरातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकांदळी येथे अनंत पतसंस्थेत भर दुपारी सशस्त्र हल्ला;गोळीबारात व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू,गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद
Next articleवीज कंत्राटी कामगारांचे गाऱ्हाणे शिवसेना भवनावर