नामदेव भोसले यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

अमोल केळकर,पुणे

मराठी साहित्य मंडळ आयोजित
तिसरे राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर संमेलन म्हसवड येथे पार पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र या साहित्य संमेलनांमध्ये आदिवासी समाजसेवक व आदिवासी साहित्यिक नामदेव भोसले यांघा समाज भूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 वेळी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक ,नामदेव ज्ञानदेव भोसले बोलत होते. आजपर्यंतचे माझे सर्व पुरस्कार माझ्या दुःखी पिढीत आदिवासी बंदू भगिनी व आई वडीलांच्या चरणी अर्पण केले आहेत.

या साहित्य संमेलनाचे व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरन्त आंबेडकर, अध्यक्ष म्हणून खाजदार श्रीनिवास पाटील हे उपस्थित होते. जेष्ठ साहित्यिक जयप्रकाश घुमटकर, पत्रकार , सुनील भोसले, व आदी राज्यातील कवी, व्याख्याते, सन्मानित पुरस्कार विजेते या मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ग्रंथदिंडी काढली दुपारी कवी संमेलन व परिसंवाद कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्य भूषण पुरस्कार व समाज भूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नामवंत सत्कारमूर्तीचा संन्मान करण्यात आला. मराठी साहित्य म॔डळ आयोजित कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी केले,

Previous articleक्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना नोकरी मिळण्यासाठी आमरण उपोषण
Next articleसंडे वन” वर फडकाविला तिरंगा : टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सची साहसी मोहीम फत्ते