अष्टापूरला रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण

अमोल भोसले,उरुळी कांचन

सुभाष जगताप युवा मंच अष्टापुर यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या कल्पना सुभाष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टापूरच्या सरपंच कविता योगेश जगताप, युवा नेते योगेश जगताप यांच्या वतीने भव्य तुळशी विवाह व भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०० ते १२० महिलांनी सहभाग नोंदवला व या स्पर्धेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. अष्टापुरच्या सरपंच कविता योगेश जगताप यांच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे तीन क्रमांक काढण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. मयुरी गुणवंत कोतवाल, द्वितीय क्रमांक कु. अनुष्का निकाळजे, तृतीय क्रमांक मोनिका कोतवाल यांनी पटकावला.

स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून हवेली तालुक्याच्या भाजपा आघाडीच्या महिला अध्यक्ष सुवर्णा कांचन, न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुरचे शिक्षक कुंजीर सर आणि शिंदे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

बक्षीस समारंभ पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, जिल्हा परिषदेच्या सदस्या कल्पना सुभाष जगताप, अष्टापुरच्या सरपंच कविता योगेश जगताप, आष्टापूरचे उपसरपंच कालिदास कोतवाल, अष्टापुर ग्रामपंचायतचे सदस्य सोमनाथ कोतवाल, संजय कोतवाल, गणेश कोतवाल, सुभाष कोतवाल, अतुल कोतवाल, हरिभाऊ शिंदे, सदस्या अलका कोतवाल, पुष्पा कोतवाल, रेश्मा ढवळे, कविता कोतवाल, अश्विनी कोतवाल, तंटामुक्ती अध्यक्ष विजय कोतवाल, भैरवनाथ प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष आबासाहेब कोतवाल, अजित विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजी कोतवाल, माजी ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी, आष्टापूर गावचे माजी उपसरपंच शामराव सोपान कोतवाल, बिवरीच्या सरपंच कविता जालिंदर गोते, हिंगणगावच्या सरपंच सुनीता थोरात, सदर बक्षीस समारंभासाठी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय कोतवाल यांनी केले.

Previous articleजागतिक पुरुष दिन अनोख्या पद्धतीने महानगरीत साजरा:आपला आवाज न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचे आयोजन
Next articleसोन्याचे अडीच तोळे वजनाचे दागिने व दोन मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत