आनंद वैराट यांना आद्य क्रांतिवीर गुरु लहुजी पुरस्काराने सन्मानित

अमोल भोसले,उरुळी कांचन

थेऊर येथील आंबेडकरी चळवळीतील समाजसेवक दलित महासंघ संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा आद्य क्रांतीगुरू लहूजी २०२१ पुरस्कार देण्यात आला.

याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती आ.निलमताई गोर्हे, मा.राज्यमंत्री सचिन अहिर, आमदार निलेश लंके, मा .राज्यमंत्री रमेश बागवे, मा.आमदार राजिव आवळे, उपआयुक्त सामाजिक न्याय विभाग रमेश कदम, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, रिपाइं मातंग आघाडी प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, लहुजी समता परिषदेचे अनिल हतागळे ,समितीचे अध्यक्ष विजय डाकले, सदस्य बाळासाहेब भांडे, आजी , माजी नगरसेवक उपस्थीत होते.

Previous articleगारवा हॉटेलचे मालक स्व. रामदास आखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
Next articleमहाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत लोणी काळभोर येथे ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताह साजरा