गारवा हॉटेलचे मालक स्व. रामदास आखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

अमोल भोसले,उरुळी कांचन

गारवा हॉटेलचे मालक स्व. रामदास आखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर रोट्री ब्लड बँक तसेच संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले होते. यावेळी १०१ रक्तदात्यानी रक्तदान करुन सहभाग नोंदवला. प्रत्येक रक्तदात्यास पाच लाखाचा अपघाती विमा देण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावजीबुवाची वाडी येथील शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन स्व. रामदास आखाडे फाउंडेशन तसेच स्व.विजय नामदेव राजवडे मित्र परिवारने केले.

Previous articleशुभम केदारी या युवकाची सोन्याची चैन अज्ञात दुचाकीस्वाराने नेली पळून
Next articleआनंद वैराट यांना आद्य क्रांतिवीर गुरु लहुजी पुरस्काराने सन्मानित