शुभम केदारी या युवकाची सोन्याची चैन अज्ञात दुचाकीस्वाराने नेली पळून

नारायणगाव, किरण वाजगे

नारायणगाव (ता.जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गावरील वारुळवाडी नारायणगावला जोडणाऱ्या मीना नदीवरील पुलावर शुक्रवार (दि.१९) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शुभम रोहिदास केदारी या युवकाची गळ्यातील ३ तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात दोन जणांनी दुचाकीवरून मागून येऊन खेचून नेली

यावेळी वारूळवाडी बाजूकडून नारायणगाव बस स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या शुभम रोहिदास केदारी यांनी आपल्या बाईक वरून त्या दोन चोरट्यांचा पाठलाग केला.तसेच चोर चोर असे आरडाओरडा करत सुमारे अर्धा किलोमीटर परेरा पेट्रोल पंपापर्यंत त्यांचा पाठलाग केला. परंतु ते चोरटे वेगात पळून जाण्यात यशस्वी ठरले.

याबाबतची तक्रार नारायणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिले.

दरम्यान या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार गणेश वाजगे यांनी सांगितले की, नारायणगाव बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून वारंवार अशाप्रकारे घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांनी व ग्रामपंचायतीने देखील सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत की नाही या बाबीची खबरदारी घ्यावी. व या घटनेचा तपास तात्काळ लावावा.

Previous articleधर्मवीर संभाजी पतसंस्थेचे सामाजिक दायित्व उल्लेखनीय – संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे
Next articleगारवा हॉटेलचे मालक स्व. रामदास आखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर