पानिपतच्या युद्धात मोलाची कामगिरी करणारे मराठा फौजेचे सरदार अनाजी गंधे यांचे वंशज योगेश्वर गंधे यांची श्रीक्षेत्र निमगाव खंडोबाला भेट

राजगुरूनगर – श्रीक्षेञ निमगाव खंडोबाला येथील खंडोबा मंदिराला मराठा फौजेचे सेनापती सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांचे थेट वंशज सरदार योगेश्वर गंधे यांनी भेट दिली व खंडोबा देवाचे मनोभावे दर्शन घेइन बेलभंडारा उधळला. खंडोबा गडाची पाहणी केली.

पानिपत च्या युद्धात गंधे यांची मोलाची कामगिरी केली होती. त्यांचा खंडोबा देवस्थान ट्रस्ट च्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विकासशेठ शितोळे कार्याध्यक्ष शिवशंभू छावा प्रतिष्ठान यांनी स्वागत सत्कार केला.

सरदार योगेश्वर गंधे यांनी मंदिरातील नाक्षीकामाचे विशेष कौतुक केले व व गावातील चंद्रचूड यांच्या वाड्याची पाहणी केली.मंदिराच्या विकासासाठी लागणारी सर्व मदत करणार आसल्याचे सांगितले.

यावेळी विश्वस्त सलीम भाई पठाण ,सागर शिंदे ,पाटील,सुरेश शिंदे पाटील,धनंजय वायकर ,दत्तात्रय दाभाडे ,बाबा साहेब भगत ,दत्ता वायकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleकानगावमध्ये हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस अभिवादन
Next articleधर्मवीर संभाजी पतसंस्थेचे सामाजिक दायित्व उल्लेखनीय – संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे