भोसे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित सदगुरू बापुसाहेब मिटकर मॉडर्न विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

चाकण– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इ.१०वी व १२वी मार्च २०२० प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणेचे भोसे ( ता.खेड ) येथील सदगुरू बापुसाहेब मिटकर मॉडर्न विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बाजी मारली. १०० टक्के निकाल लागल्याने विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे भोसे गावच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक करीत अभिनंदन केले आहे. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागल्याने परिसरातील मान्यवरांनी या विद्यालयाच्या यशाबद्दल अभिनंदन तर शब्द सुमनांचा वर्षाव केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक:गौरी देविदास जाधव ९०%,द्वितीय क्रमांक : साक्षी साहेबराव गांडेकर ८७.४० % ,तृतीय क्रमांक : श्रेया दत्तात्रय कुटे ८४.२० %, चतुर्थ क्रमांक : साहिल विश्वास कोकणे ८२.२० % प्राप्त केले. तर कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल : १००% ( वाणिज्य विभाग ) प्रथम क्रमांक : प्रज्वल आण्णासाहेब पिंगळे ७४.७६%, द्वितीय क्रमांक : विकास निळकंठ पवार ७३.२३%, तृतीय क्रमांक : तेजल दत्तात्रय गांडेकर ७१.६९ % यांनी प्राप्त केले.

विशेष म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठता ठेवणे हेच माझा खेळ मला शिकवतो. ना ऊन वारा,पाऊस ना दिवाळी,ना होळी,ना पुरण पोळी सतत मैदानावर सराव करत असताना प्रगतीची दुसरी बाजू म्हणजे शाळा आणि अभ्यास सांभाळत कसरतीच काम पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर माणुस आकाशालाही गवसणी घालु शकतो. हे आपण साक्षात अनेकदा पाहिलंय. तसेच काहीतरी गौरी, साहिल,प्रज्वल, विकास यांनी खेळाच्या मैदानात बाजी मारताना अभ्यासाच्या मैदानातही बाजी मारली.असे प्राचार्य गोकुळ कांबळे यांनी सांगितले. माजी मुख्याध्यापिका निता वर्मा यांचे विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

प्रशालेतील शिक्षकवृंद कैलास निळकंठ,शिवाजी थिटे,योजना कुटे, चतुर पाटील,ऐश्वर्या वायभासे,संगिता हलगे,नरसिंह पांचाळ,मिनाक्षी पुंडे, दिपीका जाधव , सूवर्णा गांडेकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे समस्त ग्रामस्थ भोसे,शालेय समिती, महाविद्यालयीन समन्वयक समितीच्या पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

सर्वच विद्यार्थ्यांनी उच्च पदे प्राप्त करण्यासाठी अतोनात परिश्रम घेऊन शेतकरी , कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक झेप दाखवून देणार व भोसे नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार असल्याचा संकल्प यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केला आहे.

Previous articleजुन्नर तालुक्यात आज २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न
Next articleखासदार अमोल कोल्हे यांच्याकडून मेदनकर कुटुंबियांचे सांत्वन