संघर्ष प्रतिष्ठान आयोजित गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण

अमोल भोसले,उरुळी कांचन

भारताच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे खरे साक्षीदार गडकिल्ले असून त्यांचे संवर्धन होणे हि काळजी गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती महिला बालकल्याणच्या योगीनी कांचन यांनी व्यक्त केले.

संघर्ष प्रतिष्ठान उरुळी कांचन आयोजित पदमश्री डॉ. मणिभाई देसाई गड किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेस पुजन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याणच्या माजी सभापती योगीनी कांचन उपस्थित होत्या. यावेळी पुणे जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोनबा चौधरी, राष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने, उरुळी कांचन पतसंस्थेचे संचालक शिवाजी कांचन, युवा नेते निखिल कांचन, शंकर पाटील, सौरभ जगताप हे उपस्थित होते. एकूण ६० किल्लेदाराने स्पर्धेत सहभाग घेतला होता.

यावर्षी प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक अनुक्रमे छत्रपती ग्रुप, रणझुंजार ट्रेकर्स, केदार जाधव, प्रतीक भोंगळे, निशा कुंभारकर यांनी पटकावला. तर साहिल खलसे, अश्विनी गिरी, वंश जाधव यांना विशेष प्राविण्य देऊन गौरविण्यात आले. दरवेळेप्रमाणे सहभागी प्रत्येक किल्लेदारास सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कांचन यांनी तर आभार अनिरुद्ध पवार यांनी मानले.

Previous articleउरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान गुप्रचा खा.अमोल कोल्हे व आ.अशोक पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान
Next articleचोरीच्या गुन्ह्यातील आरोपी २४ तासात जेरबंद : यवत पोलिसांची कामगिरी