उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान गुप्रचा खा.अमोल कोल्हे व आ.अशोक पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन (ता.हवेली) येथे गेली अनेक वर्षे ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान गुप्र निरपेक्षपणे पंचकृषी मध्ये पर्यावरणच्या दूष्टीने वृक्षारोपण तसेच स्वच्छता मोहीम दर रविवारी सकाळी एक मेसेज व्दारे सुशिक्षित तरुण वर्ग एकत्रितपणे सामाजिक भावनेतून काम करतात. जानाई डेव्हलपर्सचे चेअरमन सागर पोपट कांचन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये विशेष जाहीर सत्कार ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान गुप्रचा सन्मान शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर,सरपंच संतोष कांचन,मा.सरपंच आण्णा महाडिक, पु.जि.नि.समिती सदस्य संतोष कांचन, ग्रामपंचायत सदस्य मयूर कांचन, युवा नेते संदीप गव्हाणे, सुभाष बगाडे, राजु भाटे सह स्थानिक पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्वच्छता अभियान गुप्र मधील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आतापर्यंत विविध स्तरावर ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला आहे.निर्मळ वारी,प्लास्टिक बंदी,आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहे.

Previous articleराज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून भरभराट करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडं
Next articleसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण