वारंवार पाठपुरावा केल्याने बोरीभडक पुलाचे काम सुरू- उमेश म्हेत्रे

   सुरेश बागल,कुरकुंभ

बोरीभडक – बोरीऐदी ( ता. दौंड) गावाला मुळा मुठा नवीन कॅनालवरील पुलाचे काम लवकरात लवकर चालू करावे. पुलावर जड वाहतूक असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता म्हणून २ वर्षांपासून यवत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आणि दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार फोन व प्रत्यक्ष भेटून आंदोलनाचा इशारा दिला होता तसेच पुलाचे काम लवकरात लवकर करण्यासाठी वारंवार सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी विनंती केली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे आणि लवकर न झाल्याने मानवी जीवन धोक्यात येत आहे : उमेश म्हेत्रे

दौंड तालुक्यातील सहजपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी १२ दिवसांपूर्वीच पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते लवकरच काम सुरू करण्यासाठी विनंती केली होती आणि म्हेत्रे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.६-११-२०२१ शनिवारपासून पोकलॅन मशीन लावून जुना पुल पाडला जात आहेत अजून २-३ दिवसांत पुल पाडले जाईल तरीही सध्या कॅनालला पाणी सोडणे बंद आहे तरीही ज्या ठेकेदाराने काम घेतलं आहे ते काम उत्कृष्ठ दर्जेदार व लवकरात लवकर व्हावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

Previous articleउरुळी कांचन भाजप शहराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किल्ले,रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण
Next articleदरोडेखोराला पकडणारे पोलीस कर्मचारी संदीप कदम यांचा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी विशेष पुरस्कार देऊन केला सन्मान