हिंगणगाव मध्ये आरोग्य शिबीर संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

हिंगणगाव (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत व विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंगणगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन निवृत्त फौजी बाबुराव पांडुरंग थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्यावतीने उंची,वजन, शुगर, डायबिटीस, बीपी व डोळे अशा विविध आजारांवर चेकअप करून औषध पुरवठा करण्यात आला. ज्यांना डोळ्याचे प्रदीर्घ आजाराने आहेत अशा लोकांना पुढील उपचारासाठी शासकीय किंवा खाजगी हॉस्पिटल मध्ये जाण्याची सल्लाही देण्यात आला.

यावेळी गावचे सरपंच विद्यासागर थोरात, उपसरपंच सुखदेव कांबळे, अंकुश कोतवाल , कुंडलिक थोरात, सुभाष गायकवाड , लंका वेताळ, सागर थोरात, माऊली थोरात, शशीकला पोपळघट ,उत्तम लबडे ,गोरख थोरात, भगवान गडदे, विजय थोरात ,किसन थोरात, संतोष थोरात, विजय थोरात, संतोष काची आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleनामदेव भोसले यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर
Next articleउरुळी कांचन भाजप शहराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किल्ले,रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण