श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात (सन १९९२-९३ ) एसएससीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

राजगुरूनगर – श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून एस.एस.सी. सन १९९२-९३ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरुजनांचा कृतज्ञता सन्मान सोहळा शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत तासगावकर होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना अजूनही शाळेविषयी आस्था व प्रेम आहे तसेच माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यालयात विविध सुविधा वाढविण्यासाठी असे माजी विद्यार्थी मेळावे होणे आवश्यक आहे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख अतिथी माजी शिक्षक बाबासाहेब काळे , जनार्दन खरात, रशीद शेख सुरेश कुदळे, शहाजी लांडगे, मेहमुद मुलाणी, अरुण सुतार या मान्यवरांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमात सर्व शिक्षकांना फेटा बांधून सन्मानचिन्ह व ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भेट देऊन कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडला. माजी विद्यार्थी सिताराम कराळे यांनी हा माजी विद्यार्थी मेळावा घेण्यासाठी सर्वांनी कसे प्रयत्न केले, मित्र कसे शोधले, मेळाव्याच्या कोअर कमिटीने कशा पद्धतीने यशस्वी नियोजन केले याचा आढावा घेतला.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणी, गंमती जमती, विविध प्रसंग सांगितले व या शाळेमुळेच आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहोत असे मनोगत व्यक्त केले.विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधी देऊ असेही यावेळी त्यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लता मांदळे, मीरा कराळे, पुष्पा मोरवे, संजय भागवत, काळुराम लंगोटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब ढेरंगे, सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी आणि आभार संदीप येवले यांनी मानले.

Previous articleशिवसेनेच्या शिवसहकार सेनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील कुंजीर यांची निवड
Next articleसिद्धेगव्हाण ग्रामस्थांकडुन सचिन ओहोळ यांचा सन्मान व मिरवणूक