शिवसेनेच्या शिवसहकार सेनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील कुंजीर यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी सामाजिक विधायक अध्यात्मिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व स्वप्नील वसंतराव कुंजीर यांची शिवसेनेच्या शिवसहकार सेनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई येथील शिवसेना भवन येथे आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वप्नील कुंजीर यांना महाराष्ट्र राज्य शिवसेना सहकार सेना अध्यक्षा शिल्पा सरपोतदार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी शिवसेना समन्वयक – माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे, सहकार सेना जिल्हा अध्यक्ष रमेश जाधव, माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, संतोष कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, उत्तम कुंजीर आणि काळूराम कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते.

पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सहकार क्षेत्रात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत स्वप्नील कुंजीर यांनी सांगितले.

Previous articleपहिणे नवरी सुळक्यावर फडकाविला तिरंगा
Next articleश्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात (सन १९९२-९३ ) एसएससीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात