सावरदरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना फराळ व मिठाई वाटप

चाकण- दिपावली निमित्त सावरदरी गावातील ठाकरवाडीतील आदीवासी बांधवांना फराळ व मिठाई वाटप करण्यात आले. गेली दोन वर्षे कोरोनामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे अश्यात या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज उमटुन दिवाळीचा सण आनंदमयी जावो या उद्देशाने एक सामाजिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासन्याचे प्रयत्न सावरदरी ग्रामपंचायतीने केले.


यावेळी सरपंच भरत तरस, उपसरपंच पै संदिप बाळासाहेब पवार,सदस्य संदिप मेंगळे, सौ मिराबाई कदम,सौ बारकाबाई गावडे, पोलिस पाटील राहुल साकोरे, राष्ट्रवादी काँग्रेस विभाग अध्यक्ष अमोल पानमंद,मा उपसरपंच लालासाहेब मेंगळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेटे, कुंडलिक बुचुडे, संतोष शिंदे सर, बाळासाहेब पवार,गणपत साकोरे, श्रीहरी सोनवणे, बाबुराव शेटे, अंकुश कदम,भगवंत शिंदे, बाजीराव बोत्रे, बाळासाहेब साकोरे, विश्वास धोंडगे, युवराज पवार,शिवाजी पवार,काळुराम पवार,नानासाहेब शेटे,अक्षय शेटे, संतोष शेटे,शरद तरस, निखिल पवार, युवराज बोत्रे, अनिल शिंदे, स्वप्नील पवार,आप्पा शेटे, सोमनाथ पवार,साहिल बुचुडे, नितीन पवार, कुमार धोंडगे, सुनिल शेटे, कृष्ण साकोरे, राजु शेटे, सुधिर धोंडगे, गणेश शेटे, अतुल बोत्रे, मिथुन शिंदे, ऋषिकेश पवार, वैभव शिंदे, संतोष पवार,करण शिंदे,बारकु वाडेकर, गणपत गावडे, मारूती मेंगळे,राजु मेंगळे, भैरव मेंगळे, विलास गावडे,तेजस काकडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सावरदरी ग्रामपंचायत नेहमी सामाजिक दृष्टिकोन ठेऊन समाजहितासाठी काम करेल असे मत सरपंच भरतशेठ तरस यांनी व्यक्त केले.

Previous articleविकास दादा ठाकूर मित्र परिवार आयोजित किले बनवा स्पर्धेत धामणेच्या आदेश कोळेकरने पटकावला प्रथम क्रमांक
Next articleपहिणे नवरी सुळक्यावर फडकाविला तिरंगा