“गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक” या संकल्पनेतून दौंड तालुक्यात शिवसेना शाखांचे उद्घाटन

योगेश राऊत, पाटस

वाटलुज, मलठण, मुगाव ज्योतिबा नगर या गावात शिवसेना शाखांचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हि संकल्पना घेऊन दौंड तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आज वाटलुज, मलठण, मुगाव ज्योतिबानगर येथे शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना शाखेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य जनतेच्या समस्या शिवसैनिक व पदाधिकारी यांनी सोडवल्या पाहिजेत

तसेच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाने राज्य सरकारच्या विविध योजना सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचवण्याचे काम शाखेतील पदाधिकारी यांनी करावे असे अहवान शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी केले.

या वेळा अनेक शेतकरी, महिला,तरूण व युवकांनी जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी पक्षात स्वागत केले व सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख देविदास दिवेकर, महिला तालुका संघटक छाया जगताप, स्वाती ढमाले,शिवसेना दौंड शहर प्रमुख आनंद पळसे,महिला विभाग संघटक ललिता डाळिंबे, उपतालुका प्रमुख नवनाथ जगताप, विभाग प्रमुख काका परदेशी, अभिजीत डाळिंबे, हनुमंत निगडे, उप विभाग प्रमुख संजय आटोळे, शिवाजी साळुंखे, राहुल फडके, शाखाप्रमुख आबासाहेब देवकाते, नानासाहेब कांबळे, नानासो भांडवलकर, संजय पासलकर शिवसेनेचे शिवाजी शितोळे, प्रशांत जगताप, शंकर शितोळे, शंकर ठोंबरे,पप्पू पासलकर व इतर शिवसैनिक ,पदाधिकारी व उपस्थित होते.

Previous articleदौंड महाविद्यालयात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleकराटे परीक्षा स्पर्धेत दौंडच्या खेळाडूंची यशस्वी कामगिरी