तुळशीराम चौधरी यांची श्रीदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन —प्रतिनिधी

पेठ -नायगाव (ता.हवेली) येथील तुळशीराम उत्तम चौधरी यांची श्रीदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सह संचालक मंडळाच्या उपस्थिती मध्ये सदरची निवड करण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित संस्थेचे चेअरमन सुरज चौधरी, सर्व संचालक मंडळ , पेठ गावचे उपसरपंच सचिन हाके, गणेश चौधरी, पांडुरंग आंबेकर, आण्णासाहेब कोतवाल आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या युगात नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे सभासदांना व येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्याप्रकारे सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमच्या सर्व संचालक मंडळाचा प्रयत्न अआहे असे मत श्रीदत्त ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष सुरज चौधरी यांनी सांगितले.

Previous articleनारायणगाव मध्ये आज मोठ्या प्रमाणावर पाऊस
Next articleबॅक ऑफ इंडियाच्या उरुळी कांचन शाखेत ग्राहकांची गैरसोय; कार्यालयीन कारभाराचा होतोयं ग्राहकांना त्रास