दौंड तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्या करिता युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन

योगेश राऊत ,पाटस

दौंड तालुक्यात युवक व तरुणांचे असणारे असंख्य प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य इ. प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते दौंड तालुक्यातील भांडगाव, खोर, नारायण बेट, देऊळगाव गाडा, कुसेगाव या ठिकाणी युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी युवा सैनिक, पदाधिकाऱ्यांनी युवासेना व शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावली पाहिजेत असे अहवान केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, उपतालुकाप्रमुख विजयसिंह चव्हाण, युवासेना तालुका युवा अधिकारी समीर भोईटे, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी योगेश फडके, युवासेना दौंड शहर युवा अधिकारी चेतन लवांडे, युवासेना उपतालुका युवा अधिकारी शुभम माळवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने युवासेना, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Previous articleएचडीएफसी बँकेने वीज कंत्राटी कामगारांचे काढले मोफत सँलरी अकाऊंट
Next articleइंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवासेनेचे पुणे सोलापूर रोडवर सायकल आंदोलन