दौंड महाविद्यालयात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनेश पवार,दौंड:नायगांव एज्युकेशन सोसायटी मुंबईचे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विकास मंडळ व प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुंभ यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत महाविद्यालयाने विद्यार्थी व पालकांसाठी covid-19 प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन दि.30 ऑक्टोबर 2021  रोजी महाविद्यालयामध्ये करण्यात आले.याशिबिरात दोन्ही डोस साठी एकूण 105 विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य जयंता ढेकणे, विद्यार्थी विकास प्रमुख प्रा. सुनील वाघ, समन्वयक प्रा.दिनेश पवार,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सांगळे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र माने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र विभागाचे डॉ. जितेंद्र माळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यिका सुपरवायझर श्रीमती डॉ. प्रज्ञा प्रवार, आरोग्य सहाय्यक श्री. पाठक डी.डी. श्री. के.ए. जामदार,  परिचारिका आशा वर्कर उपस्थित होते .

राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने उपस्थितांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख सुनील वाघ यांनी केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र माळी यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण संदर्भात मार्गदर्शन केले. लसीकरण मोहिमेत विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थी स्वयंसेवकांनी लसीकरण नाव नोंदणी, लसीकरण व्यवस्था इत्यादी कामात सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.तुकाराम सांगळे यांनी आभार मानले.

Previous articleधर्मवीर संभाजी पतसंस्थेचा उत्कृष्ट ग्रामीण पतसंस्था पुरस्कार गौरव
Next articleदौंड महाविद्यालयात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद