पवनानगर बस स्टाँपच्या कडेला अनोळखी मृतदेह आढळला

पवनानगर-काले पवनानगर येथील बस स्टाँप च्या कडेला (दि.८ ) रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ४० ते ४५ वर्षीय अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. तरी बाजारपेठेत चौकशी केली असता ती व्यक्ती पवनानगर बाजारपेठेत वेडसर सारखा फिरत असल्याचे समोर आले आहे.या व्यक्तीची ओळख पटली नसून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मृतदेहाची शासकीय ग्रामीण रुग्णालयात रवानगी केली आहे.ओळख पटवण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस प्रयत्न करत आहेत.

काले पवनानगर परिसरात रात्रीच्या वेळी वर्दळ नसते जवळपास ग्रामस्थांचा रहिवस नसल्याने रात्रीच्या वेळी कोणीच तिकडे फिरकत नसते. पवनानगर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दळणवळण असते (दि.८ ) ऑक्टोंबर रोजी सकाळी नागरीकांना ४० ते ४५वर्षीय मृतदेह बेशुद्ध अवस्थेत पडलेला नागरिकांना दिसला हा प्रकार ग्रामस्थांनी काले पवनानगर चे पोलीस पाटील सिमा यादव यांना याबाबत माहिती मिळाली यानंतर यादव यांनी लोणावळा ग्रामीण पोलीसांना माहिती दिल्यावर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस हवालदार एन.एम.कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन या व्यक्तीला काले काँलनी ग्रामीण रुग्णालयात हलवले.

यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसून त्याची ओळख पटलेली नाही.

सदर प्रेताचे वर्णन अंगावर पांढरा शर्ट,राखाडी पँन्ट,हाताच्या मनगटावर साईबाबाचे गोंदण, सडपातळ असा बांधा आहे. सदर तरुणाची ओळख पटली नसून वरील वर्णनाचे कुठे ओळख पटल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रविण मोरे बीट अमलदार पो.ह.एन.एम.कदम मो.नं.९६८९४७४८४८ यांनी केले आहे.

Previous articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न
Next articleओबीसींच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी जनजागृती अभियान