पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आणि ‘प्राथमिक आरोग्य केंद्र, उरुळी कांचन यांच्या सहकार्याने कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण शिबीरचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते.

कोविड- १९ साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या परिपत्रकानुसार या कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के डी कांचन व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आरके.्अडसूळ हे होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असून महाविद्यालयाने या शिबिराचे आयोजन करून या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.या मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के अडसूळ म्हणाले, कोविड -१९ नियंत्रणात आला असला तरी तो पूर्णत: संपुष्टात आला नाही. यासाठी लसीकरण, योग्य सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे, शनिर्जंतुकीकरण करणे, इ. ची सवय लावून घेणे आवश्यक आहे.

कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण शिबिरासाठी उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभले. या लसीकरण शिबिरात महाविद्यालयाच्या ६७ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले.

सुरुवातीला प्राचार्यांच्या हस्ते मान्यवरांचा जास्वंदीच्या झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. बोत्रे ए. पी. यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पिंजारी डी आर यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ढोणगे एस एस यांनी केले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अडाले एल बी, प्रा. शिंदे ए एस, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. बोरकर ए.टी, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. गायकवाड एस जे कला विभाग प्रमुख डॉ. आबनावे एस व्ही, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जगदाळे ए एम, प्रा. नागवडे पी एस,प्रा.शितोळे एन डी, प्रा. झाटे ए एस,प्रा. शिंदे आर एन तसेच प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. कानकाटे व्ही एन कार्यालय अधीक्षक श्री राजपूत पी टी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.

Previous articleकानगांव ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीत
Next articleपवनानगर बस स्टाँपच्या कडेला अनोळखी मृतदेह आढळला