उद्योजक सुजितराव टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न

चाकण- वाकी येथील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सुजितराव टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविला.( दि.२३) रोजी सकाळी ९.३० वाजता प्रॅश डायबिटीस हाॅस्पिटल तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.

खेड, आंबेगाव , जुन्नर तालुक्यातील सुप्रसिध्द मधूमेह तज्ञ डॉ प्रशांत शेलार व त्यांच्या सहकार्यांच्या व आरोग्य सेवक सचिन मलघे व त्याचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या आरोग्य शिबीरामध्ये मधुमेह तपासणी , ब्लडप्रेशर तपासणी, ऑक्सिजन लेवल, शरीराचे तापमान या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरात नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी मधुमेह आणि आरोग्य या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष दिपक आण्णा टोपे , बजरंग दल अध्यक्ष किरणदादा जाधव, युवा उद्योजक सागरशेठ मलघे,पै. प्रतिक उर्फ बंटीदादा टोपे,पै. समाधान काळे,पै.प्रशांत शितोळे, पै.निखिल चिपाडे या सर्वांचे सहकार्य लाभले.आरोग्य शिबीराचे आयोजन विजयराज उद्योग समूह आणि सुजितराव टोपे मित्रपरिवार यांचे वतिने केले गेले.

Previous articleसी.ए. सागर पिंगळे यांच्या कार्यालयाचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते चाकणला उद्घाटन
Next articleआमदार बेनके, माजी आ. सोनवणे, आशाताई बुचके व सत्यशिल शेरकराच्या दारात दिवाळी पूर्वी शिमगा..?