सी.ए. सागर पिंगळे यांच्या कार्यालयाचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते चाकणला उद्घाटन

चाकण- श्रीक्षेत्र गुळाणी नगरीचा सुपुत्र सी.ए. सागर सुभाष पिंगळे यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन ‘घनवट प्लाझा’, चाकण येथे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ.निर्मलाताई पानसरे होत्या. यावेळी आमदार मोहितेपाटील म्हणाले, “ग्रामीण शेतकरी कष्टकर्‍यांची मुलं सी.ए. होणं हे तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे. सर्वतोपरी सहकार्य करुन आपण आपली माणसं मोठी करायला हवीत.” निर्मलाताई पानसरे यांनीही आपल्या भाषणामध्ये सागरचे कौतुक करुन तरुणांनी त्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी युवानेते मयुर मोहिते पाटील, सटवाजीबाबा देवस्थानचे अध्यक्ष, माजी सरपंच दिलीपशेठ ढेरंगे, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक यशवंतराव पिंगळे, सी.ए. मार्गदर्शक चंद्रशेखर दुशी, अनिलशेठ ढोबळे, मानखुर्दचे शाखाप्रमुख रोहिदास ढेरंगे, चिंचबाईगावचे माजी सरपंच संतोष गार्डी, खेड तालुका बार असोशिएशनचे मा.उपाध्यक्ष अतुल गोरडे, पुणे जिल्हा विज कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत सांडभोर, राममहाराज रोडे, माजी उपसरपंच सर्जेराव पिंगळे, सी.ए. सचिन ढेरंगे, संजय राऊत व मोठ्या संख्येने गुळाणी ग्रामस्थ, सगेसोयरे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्याचे संयोजन जालिंदर पिंगळे, अशोक गुजर, सत्यवान पिंगळे, कुमार पिंगळे, अतुल पिंगळे, प्रविण जाधव आदींनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेड तालुका शिक्षक संघाचे मा.अध्यक्ष धर्मराज पवळे यांनी केले. आभार जालिंदर पिंगळे यांनी मानले.

Previous articleखासदार ,आमदार यांच्या फंडातून वारूळवाडी गावातील विकासकामांसाठी २० लाखांचा निधी
Next articleउद्योजक सुजितराव टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न