खासदार ,आमदार यांच्या फंडातून वारूळवाडी गावातील विकासकामांसाठी २० लाखांचा निधी

नारायणगाव,किरण वाजगे

खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या निधीतून २० लक्ष रुपये खर्चाच्या वारूळवाडी येथील कॉलेज रोड वर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे भूमिपूजन खासदार डॉ. कोल्हे व आमदार बेनके यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे , युवा नेते अमित बेनके , जिल्हा नियोजन सदस्य विकास दरेकर , उद्योजक संजय वारुळे ,सुजित खैरे ,गणेश वाजगे ,सरपंच राजेंद्र मेहेर ,उपसरपंच माया डोंगरे , माजी सरपंच जंगल कोल्हे, गुलाबसेठ नेहरकर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कांकरिया , ज्योती संते , राजश्री काळे, संगीता काळे, शुभांगी कानडे ,रेखा ब्रह्मे ,सचिन वारुळे, विकास फुलसुंदर, रवी साळुंके, अविनाश घोलप, गणेश वाजगे, अतुल आहेर, जयेश कोकणे, आदी उपस्थित होते .


खा कोल्हे म्हणाले की, पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पा करीता १०३ गावांपैकी ७० गावांची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे , येत्या सहा महिन्यात रेल्वेच्या कामास प्रारंभ होईल. रेल्वे झाल्यावर फूड प्रोसेस , कोल्ड स्टोरेजला चालना मिळणार आहे . जुन्नर तालुक्यात मिनी फूड पार्क चा प्रस्ताव असून त्यासाठी आपण आणि आमदार अतुल बेनके हे प्रयत्नशील आहोत. तसेच पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी चांडोली, चाकण, मोशी या ठिकाणी सहापदरी रस्ता करण्यात येणार आहे . पुणे शहराचा विस्तार वाढत असल्याने पुढील काळात मेडीसिटी प्रकल्पासह जुन्नर , आंबेगाव आणि खेड तालुके हे ट्विनसिटी म्हणून ओळखले जातील असा विश्वास खा .डॉ .अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला .


दरम्यान वारूळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन खा . डॉ. कोल्हे यांना दिले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती संते यांनी केले तर आभार सरपंच राजेंद्र मेहेर यांनी मानले.

Previous articleवाळकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदी २१ जणांची वर्णी
Next articleसी.ए. सागर पिंगळे यांच्या कार्यालयाचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते चाकणला उद्घाटन