पाटस येथील दरोड्यातील गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक

योगेश राऊत

पाटस येथील दरोड्यातील व घरफोडीतील पाच आरोपी अटक करण्यात आलेली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार(दि .२१) रोजी रात्री पाटस येथील सायराबानु नुरूद्दीन शेख रा . कुंभारगल्ली यांच्या घरी पहाटे ०२:०० वा. च्या सुमारास दरोडा पडल्याची , संदीप आबा खंडाळे यांच्या घरी घरफोडी झाल्याची उन्हास पंढरीनाथ वळे जुनी बाजारपेठ , पाटस यांचे घरी , दिनकर कानोबा खराडे पंचशिलनगर यांचे घरी व नागेश्वर सोसायटी . रेशनिंग दुकान फोडलेची माहिती पाटस पोलीस चौकीचे रात्रगस्तीचे पोलीस अंमलदार संदीप कदम यांना सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने दरोडा घालणारे इसमांचा पाठलाग करून जुनी बाजारपेठ पाटस पोलीस अंमलदार कदम यांनी चालाखीने सात दरोडेखोरातील एका दरोडेखोराला पकडले . त्यावेळी कदम यांना त्यांच्या उजव्या पायाला त्या दरोडेखोरांनी लोखंडी पाईपने मारहाण केली . तसेच ग्रामस्थांवर दगडफेक केली . त्यामध्ये दरोडेखोर पळुन जात असताना तोही खाली पडून जखमी झालेला आहे . तात्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याच्या साथीदारावर यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे .

तसेच दरोडा पडल्याची माहिती पोलीस अंमलदार कदम यांनी पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार यांना फोनद्वारे कळवली असता मा . वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सो व पाटस पोलीस चौकीचे पोलीस उप – निरीक्षक संजय नागरगोजे , सहा . फौजदार जगताप तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यामध्ये पो हवालदार गुरू गायकवाड , पो . हवालदार निलेश कदम , पो.नाईक गोसावी , पो.नाईक रासकर , पो.कॉ. चवधर व इतर अंमलदार हे घटनास्थळी पोचून पकडलेल्या आरोपीच्या मदतीने पळुन गेलेल्या इतर दरोडेखोरांचा मा.पो.नि सो यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत आहेत .

सदर घटनेबाबत यवत पोलीस ठाणे येथे सायराबानु नुरूद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा व संदीप आबा खंडाळे यांच्या फिर्यादीवरून घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल केला असून यातील एक आरोपी १ ) सुधीर उर्फ कोंबड्या पेनशिल्या उर्फ स्पेशल भोसले रा . बेलवंडी स्टेशन त्याच्या मदतीने इतर फरार आरोपींचा शोध घेऊन ते मिळुन आल्याने पुढील आरोपी २ ) सौरभ चिका चव्हाण रा.राहुरी ३ ) अजय उर्फ साजन मोहन काळे रा.तांदळी दुमाला ४ ) निलेश रविंद्र काळे रा.गटेवाडी ता . पारनेर ५ ) विक्रम सर्जेराव भैलुमे रा.आढळगाव याना सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली असुन सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख सो , मा . अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सो , बारामती विभाग , मा . उपविभागिय पोलीस अधिकारी राहुल धस सो , मा.पोलीस निरीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली पो . उप – नि संजय नागरगोजे व इतर स्टाफ करत आहे .

Previous articleकानगांव ग्रामपंचायच्या उपसरपंचपदी नानासाहेब गवळी यांची बिनविरोध निवड
Next articleनानासाहेब गवळी यांची कानगावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड