नारायणगाव येथील साई मंदिरातील दान पेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली

किरण वाजगे,नारायणगाव

येथील खेबडे मळा शिवारातील श्री साई मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार (दि. २१) रोजी सकाळी उघडकीस आली.

दरम्यान याबाबत खेबडे मळा शिवारातील संतोष खेबडे तसेच भाऊसाहेब खेबडे यांनी यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. याबाबत अद्याप पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी सांगितले.

दरम्यान या मंदिरात आत्तापर्यंत तीन वेळा दानपेटी फोडून त्यातील ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडलेली आहे. याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा मागोवा घेण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक देशपांडे यांनी दिली.


दरम्यान सध्या अनेक ठिकाणी भुरट्या चोऱ्या, बंद दुकानांची शटर व घरांचे दरवाजे उखडून होणाऱ्या चोऱ्या, तसेच नदीवरील, धरणावरील व कॅनॉल वरील कृषी पंपाच्या केबलच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Previous articleवाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर गोळीबार, गोळीबारात दोघे ठार
Next articleकानगांव ग्रामपंचायच्या उपसरपंचपदी नानासाहेब गवळी यांची बिनविरोध निवड