सोरतापवाडी येथे महिला किसान दिन साजरा

अमोल भोसले,उरुळी कांचन

महिला किसान दिनानिमित्त सोरतापवाडी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यावेळी यशस्वी महिला उद्योजिका तसेच सोरतापवाडीच्या सरपंच संध्या चौधरी यांचा सत्कार खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला. मंडळ कृषी अधिकारी गुलाब कडलग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कृषी पर्यवेक्षक रामदास डावखर यांनी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजेनेची माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर यांनी विषमुक्त भाजीपाला उत्पादन व त्यावर प्रक्रिया करून मुल्यवर्धन याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी रुचिरा स्वप्नील कड, अनिता दत्ताताय जरांडे, अश्विनी कामठे या महिला उद्योजिका यांचा सत्कार करण्यात आला. रुचिरा कड यांनी रुचिरा ड्राय फ्रूटस या आपल्या काजू प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा सांगताना अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन उद्योजकता विकास केला पाहिजे व या करिता घरातील पुरुष मंडळींनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले. अनिता जरांडे यांनी हडपसर येथील अन्न प्रक्रिया उद्योगाची माहिती देताना दिवाळी फराळ, घरगुती खाद्य पदार्थ शेवया, कुरडया, पापड्या, आवळा कँडी, इत्यादी उत्पादनाची माहिती दिली. अश्विनी कामठे यांनी त्यांच्या दुर्गा फूड प्रोडक्ट, फुरसुंगी बद्दल माहिती सांगताना सीताफळ रबडी, स्वीट कॉर्न प्रक्रिया, फळांचे पल्प याच्या प्रक्रिया बद्दल माहिती दिली.

सरपंच तथा यशस्वी उद्योजिका संध्या चौधरी यांनी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारणी बद्दल माहिती दिली. सदर प्रयोगशाळा यशस्वी पणे चालविताना आलेल्या अडचणी व त्यावर त्यांनी शोधलेले उपाय याबाबत विस्तृत माहिती दिली.

हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिलीप वाल्हेकर, दत्तात्रय जरांडे, स्वप्नील कड यांनी शासकीय योजनांबद्दल प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले.

यावेळी कृषी सहाय्यक राजेंद्र भोसेकर, शंकर चव्हाण, महेश महाडिक, अमित साळुंखे, नागेश म्हेत्रे, मुक्ता गर्जे, ज्योती हिरवे तसेच युवा नेते अमित चौधरी तसेच ग्राम विकास अधिकारी विलास भापकर, उपसरपंच निलेश खटाटे, विजय चौधरी, आढाव ताई, ग्रा. प. सदस्य सनी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शंकर कड, सुप्रिया चौधरी, विलास चौधरी उपस्थित होते. कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते रेटवडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
Next articleवाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर गोळीबार, गोळीबारात दोघे ठार