मिरवणूक काढून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

नारायणगाव ,किरण वाजगे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतून मिरवणूक काढल्याप्रकरणी नारायणगाव येथील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती अशी की ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने नारायणगाव बस स्थानक परिसर तसेच बाजारपेठेतून काही युवकांनी एकत्र येऊन मिरवणुकीला परवानगी नसतानाही सुमारे ४० ते ५० जणांचा समुदाय जमवून तसेच मास्क न घालता व चालताना एकमेकांमध्ये अंतर न ठेवता गर्दी करून मिरवणूक काढली. या कारणामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या शहबाज निसार आतार व मोसिन अन्वर शेख (दोघेही रा. मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव ता. जुन्नर) यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १८८, २६९, २७० नुसार तसेच जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेश क्रमांक पगह / कावी/६६ १२/२०२१ जमाव जमवणे, मोठ्या घोषणा देणे, वाद्य वाजवणे, तसेच इतर नियम दिलेले असताना सुद्धा बेशिस्त वर्तन करणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार टाव्हरे हे करीत आहेत.
दरम्यान अशाच प्रकारे नारायणगाव बाजारपेठेतून दसऱ्याच्या दिवशी मिरवणूक काढून कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विनायक जाधव ओंकार गुलदगड (रा. नारायणगाव) व अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Previous articleमहात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर रोजी खानवडीत होणार – दशरथ यादव
Next articleलोणी काळभोर पोलीसांनी केली गावठी दारुची हातभट्टी उध्वस्त