लांडेवाडी येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाने १७ वर्षे शंभर टक्के निकालाची दैदीप्यमान परंपरा जपली

मंचर-लांडेवाडी येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव द. आढळराव पाटील विद्यालयाने १७ वर्षे शंभर टक्के निकालाची दैदीप्यमान परंपरा जपल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.

शिवाजीराव द. आढळराव पाटील विद्यालयातील कु. आढळराव स्नेहा प्रविण व कु. खंडागळे प्रेरणा संतोष यांनी प्रत्येकी ९५ टक्के गुण संपादित करून प्रथम क्रमांक पटकाविला. कु. लांडे वैष्णवी संतोष ९४ टक्के हिने द्वितीय क्रमांक तर कु. लांडे आदेश नंदकिशोर ९३.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व कल्पनाताई आढळराव पाटील यांच्या हस्ते लांडेवाडी, (ता. आंबेगाव) येथे संपन्न झाला.

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून विशेष म्हणजे सर्वच्या सर्व विद्यार्थी ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तर ५८ पैकी ४७ विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे. या यशाबद्दल विद्यार्थी, पालक  व शिक्षकांचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी अभिनंदन केले.

यावेळी संस्थेच्या संचालिका कल्पनाताई आढळराव पाटील, संस्थेच्या प्रशासन अधिकारी प्रा. शामल चौधरी, मुख्याध्यापक सुरेश डोके, हरिदास रामवत, राजू आढळराव, दादाभाऊ लांडे, बाळासाहेब वाघमारे, मारुती कोरडे, नितीन नलावडे, नितीन वाघमारे, निलीमा थोरात आदी शिक्षक उपस्थित होते.

Previous articleरोटरी डिस्ट्रिक ३१३१ लिटरसी कमिटीच्या वतीने शिक्षकांसाठी ‘स्मार्ट ऑनलाईन शिक्षण ‘ कार्यशाळेचे आयोजन
Next articleनातेवाईकांनी नकार दिल्याने मंचरचे सरपंच दत्ता गांजळे यांनी कोरोना संशयितावर केला अंत्यसंस्कार