आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी

अमोल भोसले, उरुळी कांचन

आमदार अशोक पवार तसेच त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, नगरसेवक तसेच शहरातील काही पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करुन आमदार अशोक पवार यांच्याबद्दल तुमचा एके दिवशी महेंद्र मल्लाव होईल, असे धमकी देऊन पत्रक वाटण्यात आले.
एका निनावी पत्रकाद्वारे दिल्याप्रकरणी सबंधित आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्यास अटक करावी व आमदार ॲड अशोक पवार यांना ताबडतोब पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली.

आमदार अ‍ॅड अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन लोणी काळभोर (ता.हवेली) याठिकाणी करण्यात आले होते. या संदर्भात पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. पत्र ज्यांनी लिहिले त्याचा योग्य तपास करुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जेष्ठ नेते माधव काळभोर, तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा उपाध्यक्ष नंदु काळभोर, पु.जि.नि.स.सदस्य संतोष कांचन, ग्राहक प्रदेश अध्यक्ष सुर्यकांत गवळी, प.स.सदस्य सनी काळभोर, विद्यार्थी ता.अध्यक्ष सनी चौधरी, ग्रा.प.सदस्य अमित कांचन, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र चौधरी, मा.सरपंच आण्णा महाडिक, ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, सरपंच विठ्ठल शितोळे, राहुल काळभोर, आप्पासाहेब काळभोर, पाडुरंग काळभोर, सुभाष काळभोर, रघुनाथ चौधरी, अर्जुन कांचन, ऋषीकेश काळभोर, रमेश मेमाणे, अनिल जगताप सह अनेक आजी माजी पदाधिकारी महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleअधिवेशन यशस्वितेसाठी आपला खारीचा वाटा उचलून जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने स्विकारावी –  एस एम देशमुख
Next articleप्रशांत पवार यांची शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड