अधिवेशन यशस्वितेसाठी आपला खारीचा वाटा उचलून जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने स्विकारावी –  एस एम देशमुख

श्रावणी कामत, पुणे

पत्रकारांना असलेले अधिकर, बंधने, संधी, समस्या, अडचणी यांचा उहापोह अधिवेशनात होत असतो. अधिवेशनातून संघटनेची ताकद सरकार व प्रशासनाला कळते व दबाव निर्माण होतो. त्यासाठी अशी अधिवेशने गरजेची आहेत. त्यामुळे अधिवेशन यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचलून जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने स्विकारावी, असे आव्हाण परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस एम देशमुख यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनला येथे अ भा मराठी पत्रकार परिषदेचे होऊ घातलेल्या ४४ व्या राष्ट्रिय अधिवेशनाच्या नियोजनाची बैठक जांबुळकर गार्डनमध्ये पारपडली. बैठकीला मुख्य विश्वस्थ एस एम देशमुख यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले.

यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बाप्पुसाहेब गोरे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर, जिल्हा समनवयक सुनिल जगताप, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, पुणे जिल्हा सचिव सतीश सांगळे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, सोशल मिडिया प्रमुख जनार्दन दांडगे, हवेली प्रमुख बाप्पुसाहेब काळभोर, पत्रकार हल्ला विरोधी जिल्हा प्रमुख के. डी. गव्हाणे, हवेली तालुका सोशल मिडिया प्रमुख गणेश सातव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस एम देशमुख यांनी ऑनलाइन पद्धतीन मार्गदर्शन कराताना पुढे म्हणाले की, अधिवेशनाला दोन महिणे राहिले आहे. त्यामुळे २४ तास अधिवेशनचा विचार माझ्या डोक्यात आहे. अधिवेशन भव्यदिव्य होणार यात शंका नाही. नियोजनासाठी दर आठ दिवसाल बैठक घेऊ. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक आकर्षक व वाचणीय स्मरणिका आपण काढत आहोत. या स्मरिकेसाठी सर्वांनी योगदान करावे, पत्रकारांनी जास्तीत जास्त जाहाराती मिळवाव्यात, स्मरिकेतील जाहिरातीसाठी आकर्शक कमिशन आहे. कुटुंब ऑपच्या माध्यमातून परिषदेची व्याप्ती वाढतेय. कुटुंब ऑप सर्वांसाठी आहे. इतर संघटनांच्या पत्रकारांनी हे ऑप स्विकारल्या सुरवात केली आहे. त्यामुळे आपल्या संघटनेचा मुळ उद्देश समोर येत आहे. आपण पारदर्शक आहोत काही लपवन्याची गरजच नाही. जास्तीत जास्त पत्रकारांनी सदस्य झाले पाहिजे. ऑपवरचे सर्व लोक परिषदेचे सदस्य आहेत असे कोणी समजू नये. परिषदेची हि मुव्हमें थांबणार नाही आहे.

परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी आपल्या मार्गदर्शात राष्ट्रीय अधिवेशनाची गरज का असते हे सांगत, अधिवेशनाच्या मध्यमातून राज्यभरातील पत्रकारांची ओळख होते. त्यांच्या भागातील समस्या व उपलब्धता लक्षात येताता. दर्जेदार लिखाणातून स्मरणीका काढण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जाहिराती स्विकारल्या जातील. त्यासाठी आकर्षक दर असुन भरघोस कमिशन मिळेल. स्मरणीकेच्या माध्यमातून पत्रकारांना थोडा उत्पन्नाचे साधन होईल असे सांगितले.

विभागीय सचिव बाप्पुसाहेब गोरे यांनी खडे बोल सुनवत मुख्याध्यापक या नात्याने ते त्यांचे कर्तव्य करत प्रत्येक तालुका संघाने आर्थिक भार उचलण्याचे आव्हाण केले. जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांनी बैठकीचे उत्तम नियोजन करत सर्व तालुकाप्रमुख व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले.

पुणे जिल्हा समन्वयक सुनिल जगताप यांनी प्रास्तावीकात अधिवेशनाचे काय नियोन करायचे, काय अपेक्षित आहे याचा उहापोह केल. अधिवेशन काळात वापरायचा लोगो, लेटरपँड, शिक्के, बँक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे. भोजन व्यवस्थेचे कोटेशन येत आहेत. मंडप नियोजन सुरु आहे. वाजवीदरात जे आपल्याल सेवा देतील त्यांच्यकडून काम करुन घेतले जाईल. किती पत्रकार येणार आहेत. त्यांना निवास, भोजन यासाठी गुगल नोंदनी करण्याची सोय करण्याचे नियोजन होत आहे. शाळेच्या ९० खोल्या आहेत, पण १ हजार ते १,२०० लोक एकाच ठिकाणी कशी सोय होईल यासाठी एका बिल्डर कडून एकाच इमारतीत सोय होईल हे पाहत आहोत. प्रत्येक तालुक्याने या अधिवेशनात सहभागी व्हावे. प्रत्येक तालुका अध्यक्षांना विचारात घेऊन नियोजन सुरु आहे. असे मत समनवयक सुनिल जगताप यांनी मांडले.

बैठकीला हवेली प्रमुख बाप्पुसाहेब काळभोर, परंदरचे अध्यक्ष राहुल शिंदे, शिरुरचे अध्यक्ष संजय बारहाते, खेडचे अध्यक्ष हणुमंतराव देवकर, दौंडचे रविंद्र खोरकर, जु्न्नरचे अध्यक्ष अतुल  कांकरीया, बारामतीचे सोशल मिडिया प्रमुख महेश जगताप, भोरचे अध्यक्ष वैभव भुतकर, पुणे शहर अध्यक्ष बाबा तारे, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अनिल वडघूले, सुनील वाळुंज, दत्तानान भोंगळे, महिला प्रतिनिधी श्रावणीताई कामत, जिल्हा महिला प्रतिनिधी सुनिता कसबे – जाधव, कांचन सर्व सोशल मिडिया प्रमुख व तालुका संघांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे स्वागत जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांनी केले. प्रास्ताविक सुनिल जगताप व बैठकीला उपस्थितांचे आभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी मानले.

Previous articleरोटरी क्लब पाटसचा पदग्रहण समारंभ संपन्न
Next articleआमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी